Baramati News l न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी येथे संविधान साजरा

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी विद्यालयांमध्ये संविधान दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. 
           सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. भारताचा अभिमान भारताचे संविधान, संविधान दिन चिरायू होवो अशा घोषणा देत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी संविधाना संदर्भात घोषवाक्य लिहिलेले फलक हातात घेऊन संविधाना विषयी जन जागृती केली.विद्यालयाचे प्राचार्य मानसिंग जाधव यांनी प्रास्ताविका मध्ये संविधान निर्मितीची प्रक्रिया आणि त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनमोल योगदान याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यार्थ्यांनी सामूहिक संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. सीमा पवार व अनिता पवार यांनी संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा चे आयोजन केले होते. संविधानावर आधारित विविध प्रश्नांची उत्तरे देत विद्यार्थ्यांनी बक्षिसे पटकावली. संविधानातील सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाही यांचे महत्त्व विशद करत भारतीय संविधान निर्मितीची प्रक्रिया त्याचबरोबर संविधानाचे देश चालवण्यासाठी महत्व प्राजक्ता यादव यांनी अधोरेखित केले.कला शिक्षक गणेश पोंदकुले यांनी पोस्टर मेकिंग व चित्रकला स्पर्धेचे परीक्षण केले. विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करत संविधानातील मूलभूत कर्तव्यां बरोबरच देशाप्रती व समाजाप्रती आपल्या काही जबाबदाऱ्याचे पालन करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून  राज्य निरीक्षक पदी नियुक्त झालेल्या वृषाली गडदरे या उपस्थित होत्या. संविधानातील तरतुदींमुळे सामान्य मेंढपाळच्या घरातील मुलगी भटक्या प्रवर्गातून राज्यात मुलींच्या पहिली येऊ शकली. कोणताही वशिला नसताना, कोठेही कोणत्याही प्रकारची रक्कम न भरता गुणवत्तेच्या जोरावर वर्ग 1ची अधिकारी बनू शकते. असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक भोसले यांनी तर आभार युवराज वणवे यांनी मानले.
To Top