Baramati News l उद्योग उभा करताना..उत्पादनाची गुणवत्ता, पॅकेजींग आणि बाजार पेठेची मागणी याचा विचार करणे गरजेचे : सुनंदा पवार

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सहा तालुक्यांमध्ये सुमारे ३६ हजार पेक्षा जास्त महिला शारदा महिला संघा सोबत जोडल्या आहेत. महिलांनी उद्योग उभा करताना आपल्या उत्पादनाची गुणवत्ता, पॅकेजिंग, बाजार पेठेची मागणी या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. तसेच स्वतःच्या पायावर उभा राहत असताना त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे देखील आवश्यक आहे'. असे मत एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी व्यक्त केले.
एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट व शारदा महिला संघ समृद्ध महिला अभियान याच्या अंतर्गत चला उद्योजक घडवूया महिला कार्यकमाचे आयोजन वाणेवाडी येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुनंदा पवार उपस्थित होत्या.
या वेळी प्रमुख पाहुणे सायली धनाबाई, राजेंद्र जगताप, न्यू इंडिया इंशोरन्स कंपनी चे बाळकृष्ण भिसे, राजेंद्र जगताप, प्रियांका शेंडकर, संगीता आळंदीकर, नुसरत इनामदार, अमरजा आळंदीकर, संतोष शेंडकर उपस्थित होते.
        सायली धनाबाई यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, आपल्याला नावाने, आडनावाने, जातीने न ओळखले जाता  कामाने ओळखली जावी या साठी कर्तृत्व सिद्ध केले पाहिजे. समाजामध्ये फक्त पैशाने कर्तृत्व मोजले जात नाही. त्यासाठी स्वतःचे काम, चरित्र, तसेच आपल्या सोबत आपल्या समाजातील लोकांना सोबत घेऊन जाणारे खरे कर्तृत्वान असतात.
           महिला बचत गटाने सक्षम होत आहेत, परंतु फक्त आर्थिक सक्षम होणे आवश्यक नाही. महिलांनी कुटुंबा सोबत स्वतःला देखील सक्षम ,कणखर बनवले पाहिजे. शारीरिक, आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम होणे खूप गरजेचे आहे. आपण 2025 मधील महिला आहोत. आपण शिक्षण घेतले, आपल्या आई वडिलांनी आपल्या शिक्षणासाठी कष्ट सहन केले त्याचा पुढे आपण काय उपयोग केला याचा विचार करणे गरजेचे आहे.
महिलांना शारदा संघ, सुनंदा ताई पवार यांच्या सारखा मोठा मदतीचा सोबत आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा व खूप कष्ट करा. शारदा महिला संघाच्या वतीने महिलांना गटांच्या माध्यमातून उभे करणे, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे, त्यांना यशस्वी उद्योजक होण्याकरता मार्गदर्शन करणे इ. काम केले जाते.
          शारदा महिला संघाचे  सचिन खलाटे, गजानन मोकाशी,  निकिता महामुनी, निलांबरी साळुंखे, सीमा पानसरे उपस्थित होते. 
         कार्यक्रमाचे प्रस्तावित बाळासाहेब नगरे यांनी केले व आभार प्रकाश साळुंखे यांनी मानले.
To Top