सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : दिपक जाधव
समाजात महिलांवरील अन्याय व अत्याचाराबाबतच्या घटना वाढत चाललेल्या आहेत. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांनी दीडशे वर्षांपूर्वी सुरू केलेले स्त्री मुक्तीचे कार्य महिलांनी पुढे नेण्याची गरज असल्याचे मत सुपे पोलीस स्टेशनचे सपोनी मनोजकुमार नवसरे यांनी व्यक्त केले.
सुपे ( ता. बारामती ) येथे जागतिक हिंसाविरोधी पंधरवडा आणि संविधान दिनाचे औचित्य साधून 'संवाद’ स्त्रीवादी समुपदेशन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. अर्चना मोरे उपस्थित होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नवसरे बोलत होते.
येथील मासूम संस्थेमध्ये महिलांना योग्य कायद्याची माहिती व आवश्यक मदतीचे मार्गदर्शन मिळाले तरच महिलांची सकारात्मक दिशेने वाटचाल सुरु राहील असे नवसरे यांनी सांगितले. यावेळी ॲड. अर्चना मोरे, मिना शेंडकर, मालन झगडे आदीनी ग्रामीण भागातील मासुमच्या कार्याबाबतची सविस्तर माहिती दिली.
याप्रसंगी माजी नगरासेवक महेश चांदगुडे, माजी संचालक गणेश चांदगुडे, तालुका सहसंयोजिका मीना शेंडकर, मालन झगडे, मासुमच्या कार्यकर्त्या माधुरी मेमाणे, सोनाली चांदगुडे, शारदा कुंजीर, पवन पाटील, कल्याणी उमाप आदी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुनंदा खेडेकर यांनी केले. सूत्रसंचालन माया गुरव यांनी केले. तर आभार सुप्रिया सांगळे यांनी मानले.
.......................................
