सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
३६६ व्या शिवप्रताप दिनानिमित्त श्री शंभूसाम्राज्य सेना पुरंदर अध्यक्ष बळीराम सोनवणे व कार्याध्यक्ष कालिदास उबाळे यांच्या वतीने सासवड (ता.पुरंदर) येथील गुरुकुल
करिअर ॲकॅडमीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शिवप्रताप दिनानिमित्त विविध विध क्षेत्रातील मान्यवरांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.तसेच रक्तदान शिबिर राबवण्यात आले.
प्रमुख पाहुणे अशोक गायकवाड, संगीता आठवले , अनिल जेधे देशमुख, व श्रीकांत पाटोळे यांच्या हस्ते मान्यवरांना पुरस्कार देण्यात आले. ३६६ व्या शिवप्रताप दिनानिमित्त सह्याद्रीचे रत्न फाउंडेशन बालाजी काशीद, अशोक आठवले , शेखर पाटील यांची व्याख्याने झाली.
कार्यक्रम संपल्यानंतर भोजन समारंभ होता,
सर्वांनी भोजनाचा लाभ घेतला. ह्या कार्यक्रमात पुरस्कार घेत असताना, शिवप्रताप दिनानिमित्त श्रीकांत कदम , पंढरीनाथ जाधव ,दिलीप गिरमे, ज्ञानदेव काळे, बाळासाहेब काळे, दिलीप झेंडे , विलास काळे, डॉ. विनायकराव गायकवाड, सुनील धिवार, पत्रकार सुनील लोणकर, बाळासाहेब भिंताडे, निनाद टेमगिरे-पाटील,
गौतम भालेराव, प्राचार्य. संदीप टिळेकर, रामराव गायकवाड, सोपान रणपिसे, संजय अल्हाट, राजेंद्र गिरमे, राजेश साळुंखे, अभिजीत जगताप, मंगेश भिंताडे, साकेत जगताप, पुरुषोत्तम पवार, सतीश शिंदे, राजेश धोत्रे, अजय गायकवाड, ॲड. सचिन जाधव, अजय नारायण तरे , मनोज भिसे, श्रीकांत मेमाणे, दत्तात्रय कुंभारकर, निलेश वाघुले, आदर्श द्विवेदी, परविन पानसरे, अभिनेत्री पूजा चिरमाडे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाला सीमा घोरपडे, संतोष डुबल, कल्लेश्वर पाटील, अजय राठोड, अरबाज शेख, सविता उबाळे, प्रमिला सोनवणे, अशोक रोकडे, लक्ष्मण पवार, प्रमोद खंडागळे, संजय वाघमारे आदींचा विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवर उपस्थित होते.
३६६ वा शिवप्रताप दिन श्री शंभूसाम्राज्य सेना पुरंदर अध्यक्ष बळीराम सोनवणे व कार्याध्यक्ष कालिदास उबाळे यांनी आयोजित केला होता.
