सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : सोमनाथ साखरे
मेढा नगर पंचायतीची निवडणूक प्रकिया सुरु झाली आहे. निवडणूक आचारसंहिता सुरु असताना कोणीही आचारसंहितेचा भंग करू नये असे आवाहन करताना मतदारांना कोणतेही अमिष दाखविण्याचा प्रयत्न कोणी करु नये असे आढळल्यास संबधीतांवर गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा तहसिलदार हणमंत कोळेकर यांनी दिला आहे.
मेढा तहसिल कार्यालयात पत्रकारांना माहिती देताना कोळेकर म्हणाले मेढा नगर पंचायतीचे अर्ज दि. १० नोव्हेंबर पासून भरण्यास सुरुवात होत आहे. नगरपंचायतीचे १७ प्रभाग असून ४ हजार सव्वीस मतदार आहेत . त्यापैकी १ हजार ९३६ पुरुष तर २ हजार ९० स्त्री मतदार संख्या आहे. यासाठी वेण्णा विद्यामंदिर येथे ५ , जिल्हापरिषद शाळा येथे ८, आंबेकर नगर जिल्हा परिषद शाळा १, जुनी पंचायत समिती इमारत १ , अंगवाडी क्रमांक १२३ - १ आणि भूकंप शेड - १ अशी ६ ठिकाणी १७ प्रभागासाठी मतदान केंद्रे असल्याची माहीती तहसिलदार हणमंत कोळेकर यांनी दिली.
यावेळी बोलताना तहसिलदार कोळेकर म्हणाले निवडणूकीच्या आचार संहितेचे पालन काटेकोर पणे सर्वांनी करणे गरजेचे आहे. नगर पंचायती च्या १७ प्रभागांच्या निवडी या पारदर्शक पणे होण्यासाठी प्रशासन सज्ज झालेले आहे परंतु या निवडणूकी मध्ये मतदारांना अभिषे दाखविणे, लाच देणे, धमकी देणे अशा घडत असतात. अशा घटना कोणीही घडवू नयेत अथवा करू नयेत किंवा अशा गोष्टींना पाठबळ देवु नये अशा घटना निदर्शनास आल्यास निवडणूक आचार संहितेचा भंग कायद्यातर्गत गुन्हे दाखल केले जातील असे सांगुन नगर पंचायत निवडणूक शांततेत आणि भयमुक्त वातावरणात दोणेसाठी सर्वांनी सहकार्य करयाचे आवाहन तहसिलदार हणमंत कोळेकर यांनी केले. यावेळी नायब तहसिलदार सुनिल मुनाळे उपस्थित होते.
