Baramati News l सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व्याख्यानमाला संपन्न

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहिःशाल शिक्षण मंडळ व सोमेश्वर विज्ञान महाविद्यालय, सोमेश्वरनगर ता. बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १७ डिसेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व्याख्यानमाला संपन्न झाली. 
         या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प प्रा. डॉ. रुपाली शेठ यांनी गुंफले. भारतीय ज्ञान परंपरा 'या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना व्याख्यान दिले. व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प डॉ.  अजित वामन आपटे यांनी गुंफले. त्यांनी 'श्री. छत्रपती शिवाजी महाराज आणि आधुनिक व्यवस्थापन' या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्याख्यानमालेचे अंतिम पुष्प प्रा. रुपाली अवचरे यांनी गुंफले. त्यांनी कर्तृत्व शालिनी अहिल्याबाई होळकर 'या विषयावर व्याख्यान दिले व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा. डी. व्ही. बनसोडे तसेच सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक ही उपस्थित होते. केंद्र कार्यवाह प्रा. माधुरी भांडवलकर यांनी कार्यक्रम संयोजकांची भूमिका बजावली. प्रा. जयश्री भोसले, प्रा. सुनीता घाडगे यांनी सूत्र संचालन केले. तसेच प्रा. सुप्रिया रणदिवे, प्रा. प्रियांका शिंदे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
        या व्याख्यानमालेसाठी श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष मिलिंद कांबळे तसेच संचालक प्रतिनिधी आनंदकुमार होळकर, संस्थेचे सचिव भारत खोमणे यां सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
To Top