सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या वीसगाव खोऱ्यातील नेरे - धावडी ता.भोर खिंडीतील गणोबा मंदिरात अतिथंडीचा फायदा घेत मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्याने रोकड लंपास केली.या घटनेत दानपेटीतील ४ ते ५ हजार रुपये चोरीला गेल्याचे समोर आले आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्याने रविवार दि.२८ रोजी गणोबा मंदिराची रेकी करून मंदिर परिसराचे फोटो काढीत माहिती घेतली होती असे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून आले आहे.तर सोमवार दि.२९ रात्रीच्या वेळी चोरट्याने मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोकड लंपास केली.दरवर्षी मांढरदेवी यात्रा सुरू होण्यापूर्वीच चोरीच्या घटना तालुक्यात होण्याचे प्रकार घडत असतात.त्याप्रमाणेच यंदाही मांढरदेवी यात्रा दोन दिवसांवर येऊन ठेपली असतानाच नेरे -धावडी खिंडीतील गणोबा मंदिरात चोरी घडली आहे.
