सोमेश्वर रिपोर्टर टीम------
राजगड : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील विश्व फाऊंडेशनचे ड्रिमलॅन्ड इंग्लीश स्कुलने बाजी मारली आहे. तर राजगड
तालुक्यातुन पाच प्रकल्पाची जिल्हा स्तरावर निवड झाली आहे.
पुणे जिल्हा परिषद पुणे,पंचायत समिती राजगड व श्री.शिवाजी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज नसरापुर यांच्या सयुक्त विद्यमाने तालुका स्तरीय विज्ञान
प्रदर्शनाचे आयोजन नसरापुर या ठिकाणी करण्यात आले होते,या विज्ञान प्रदर्शनात भोर व राजगड तालुक्यातुन १३६ प्रकल्प सादर करण्यात आले
होते, यामध्ये राजगड तालुक्यातील पाच प्रकल्पाची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.तर मालवली येथील ड्रिमलॅन्ड इंग्लीश स्कुल मधील कु.काव्याजली
दीपक कोडीतकर हिने वक्तृत्व स्पर्धेत प्रथम, कु.रिद्धी श्रीराम भोसले हिने निबंध स्पर्धेत द्वितीय,तसेच प्रश्नमंजुषामध्ये कु.काव्यांजली दीपक कोडीतकर,
कु.रिद्धी श्रीराम भोसले या विद्यार्थीनीनी सुयुक्तिक प्रथम क्रमांक मिळविला असुन येथील शिक्षक शुभम नंदकुमार सरपाले यांनी राजगड शिक्षक माध्यमिक गटात
प्रथम क्रमांक मिळविला आहे.विश्व फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष दसवडकर,संचालिका सुप्रिया दसवडकर व प्राचार्या तृप्ती शिळीमकर व येथील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
-----------------------
विज्ञान प्रदर्शनातील निकाल पुढील प्रमाणे (राजगड तालुका)
राजगड तालुका निकाल -प्राथमिक गट (सहावी ते आठवी): तन्वी धरपाळे (तानाजी मालुसरे विद्यालय, दापोडे),आर्यन रेणसे (राजगड विद्यालय वाजेघर),
सुजल शिंदे (राजेशिवछत्रपती विद्यालय, सोंडे). माध्यमिक गट (नववी ते बारावी) : प्रसेनजीत माने (तोरणा विद्यालय वेल्हे), आयुष कोडीतकर (न्यू इंग्लिश स्कूल विंझर),
वैभव पवार (मातोश्री सोनाबाई देडगे विद्यालय रुळे).
प्राथमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य प्रकल्प : शुभम सरपाले' (ड्रिमलँन्ड इंग्लिश स्कूल मालवली), श्रीमती एस डी भोसले (प्राथमिक शाळा निगडे बुद्रुक).
माध्यमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य प्रकल्प : बी. डी. रासकर (राजेशिवछत्रपती विद्यालय सोंडे), एन जे माळी (न्यू इंग्लिश स्कूल पासली).
परिचर उपकरण प्रकल्प : एस आर सोंडकर (राजेशिवछत्रपती विद्यालय सोंडे), एस एम गरड (न्यू इंग्लिश स्कूल पासली).
यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.यावळी राजगड तालुका शिक्षण विस्तार अधिकारी शकील मुल्ला,मुख्याघ्यापक संघाचे अध्यक्ष शंकर नाक्ती, प्राचार्य सुभाष वाल्हेकर, प्राचार्य भगवान बेल्हेकर,प्राचार्य मोहन किन्हाळे,प्राचार्या तृप्ती शिळीमकर आदीसह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
