सुपे परगणा l सुप्याच्या विद्या प्रतिष्ठान शाळेत गणिताच्या विश्वात रमले विद्यार्थी : राष्ट्रीय गणित दिन साजरा

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दीपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठान संचालित इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये गणिताच्या विश्वात रममान होवून गणितातून जीवनशैली घडविण्याचा संदेश देणारा राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 
             यावेळी राष्ट्रीय गणित दिनानिमित्त इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्गनिहाय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये इयत्ता पहिली व दुसरीसाठी भौमितिक आकार बनविणे, इयत्ता तिसरी व चौथीसाठी गणितीय गोष्ट सांगणे, इयत्ता पाचवी व सहावीसाठी 'गणितीय मॉडेल बनविणे' व इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 'गणितीय रांगोळी काढणे' या स्पर्धांचे वर्गनिहाय आयोजन करण्यात आले होते. या विविध स्पर्धांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपला सहभाग नोंदविला. त्यामुळे राष्ट्रीय गणित दिन स्पर्धा, उपक्रम आणि नवकल्पनांनी खऱ्याअर्थाने उजळून निघाला. 
       या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या सर्व गणितीय आदर्श नमुन्याचे यावेळी प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य डॉ. योगेश पाटील यांनी केले. 
        यावेळी विजेत्या स्पर्धकांना शाळेचे प्राचार्य डॉ. योगेश पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच गणित दिनाचे औचित्य साधून स्वप्रा अबॅकस प्रमुख प्रमोद मोरे व शितल जांभुळकर यांच्या हस्ते जिल्हास्तरावरील अबॅकस स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पदक देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व  आभार प्रज्ञारुची कांबळे यांनी मानले.
             .................................
To Top