सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांचा सन २०२४~२५ चा सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार आपल्या श्री सोमेश्वर सह.साखर कारखान्यास जाहीर झाला असून गतवर्षी आपल्या कारखान्याला राष्ट्रीय पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आले आहे. सर्व शेतकरी सभासद बंधूंच्या सहकार्याने आपला कारखाना राज्यात एक नंबर कामगिरी करणारा ठरला आहे.
आपल्या हक्काचा,मालकीचा कारखाना कसा आहे? कारखान्यातील यंत्र सामग्री कशी आहे ? साखर कशी तयार होते, वीज निर्मिती कशी होते, अल्कोहोल, इथेनॉल या उपपदार्थांची निर्मिती कशी केली जाते हे अजून ही अनेक सभासद बंधूनी पाहिलेल नाही. चला तर मग राज्यात सर्वोत्कृष्ट ठरलेला आपल्या हक्काचा, मालकीचा श्री सोमेश्वर कारखाना प्रत्यक्ष पाहूयात.....
नवीन वर्षाच्या सुरुवातीला उद्या दि. १ जानेवारी रोजी सर्व सभासदांना कारखाना आतून प्रत्यक्ष पाहता येणार आहे. सभासदांनी ठीक १०.३० वाजता मुख्य कार्यालय, सोमेश्वर सह. कारखाना स्थळ या ठिकाणी उपस्थित रहावे असे आवाहन कारखाना प्रशासनाने केले आहे.
