सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : प्रतिनिधी
दर्पनकार बाळशास्त्री जांभेकरांनी सुरु केलेली पत्रकारीकता आज ही समाजाला दिशा देणारी ठरत असुन चांगले काम करणाऱ्याला मोठ तर वाईट काम करण्याला छोट करण्याची ताकद पत्रकारांच्यात असल्याने लोकशाही चौथ्या आधारस्तंभाचे पत्रकार यांचा सन्मान करण्याचा आनंद वेगळाच असतो असे प्रतिपादन मेढा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. रुपाली वारागड यांनी केले.
मेढा नगर पंचायतीला वतीने नगरपंचायत कार्यालयात तालुक्यातील पत्रकारांचा दर्पनकार बाळशास्त्री जांभेकरांच्या जयंती निमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधुन केला. यावेळी नगराध्यक्षा सौ. रुपाली वारागडे, नगरसेवक विकास देशापांडे, शिवाजीराव गोरे, नितिन मगरे, आनंदी करंजेकर, अनघा करंजेकर, मुख्याधिकारी अजिंक्य पाटील, नेते आनंदा कांबळे, कर्मचारी वृंद व पत्रकार यावेळी उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्षा सौ. रुपाली वारागडे यांनी आद्य प्रवर्तक बाळशास्त्री जांभेकरांनी ६ जानेवारी १८ ३२ मध्ये दर्पन हे पहिले वृतपत्र सुरु केले. तो काळ पारतंत्र्याचा असून आपली लेखणी तेवत ठेवली होती. तिच लेखनी परंपरा आजही पत्रकारांनी जपली आहे. पत्रकार म्हणजे समाजासाठी आरसा असून व्यक्तीचे प्रतिबिंब स्पष्टपणे मांडणारा हा पत्रकार आहे. चुक बरोबर असा रोख ठोक लेखा जोखा मांडणारा प्रशासनावर अंकूश ठेवणारा पत्रकार असतो असेही त्या यावेळी म्हणाल्या.
दरम्यान प्रारंभी दर्पनकार बाळशास्त्री जांभेकरांचे प्रतिमेचे पुजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकारांचे वतीने जेष्ठ पत्रकार नारायण शिंगटे यांनी पत्रकारांचे वतीने नगर पंचायतीने सुरु केलेल्या पत्रकार दिनाचे कौतुक करीत नगरपंचायतीचे धन्यवाद मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नगरसेवक शिवाजीराव गोरे यांनी तर आभार नगरसेवक विकास देशपांडे यांनी मानले.
