Sugar Factory l 'सोमेश्वर'च्या उपाध्यक्षपदी कोणाची वर्णी? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेणार अंतिम निर्णय

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान उपाध्यक्षांची मुदत संपल्याने नवीन उपाध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार? याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. पाच वर्षांत पाच उपाध्यक्ष होणार होते. मात्र आता कारखान्याच्या निवडणुकीला अवघे चार ते पाच महिने उरल्याने नवीन होणाऱ्या उपाध्यक्षाला अवघे काही महिन्यांवर समाधान मानावे लागणार आहे. 
           याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे अंतिम निर्णय घेणार असून, कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनांतर निवड प्रकियेची सर्व जबाबदारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर आली आहे. उपमुख्यमंत्री पवार कोणाला संधी देणार की आहे तोच उपाध्यक्ष पुढील चार महिन्यांसाठी कायम करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 
        बारामती, पुरंदर, खंडाळा व फलटण या चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या सोमेश्वर कारखान्याच्या उपाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळयात पडणार? सुरुवातीला काळात आनंदकुमार होळकर यांना उपाध्यक्षपद देण्यात आले, त्यानंतर महिलांमधून पहिल्यांदाच प्रणिता खोमणे यांना संधी देण्यात आली. त्यानंतर पुरंदर तालुक्याला संधी देत बाळासाहेब कामठे यांना उपाध्यक्षपदी संधी देण्यात आली. त्यानंतर मिलिंद कांबळे यांना उपाध्यक्षपदी देण्यात आले. सद्याचे उपाध्यक्ष मिलिंद कांबळे यांचा ३ एप्रिलला उपाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत असून पुढील चार ते पाच महिन्यांसाठी कोणाला संधी देणार? 
सोमेश्वर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक १२ ऑक्टोबर २०२१ रोजी पार पडली होती. त्यामुळे ऑगस्ट महिन्यापासूनच कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे अशी चिन्हे दिसत आहेत.
To Top