संचारबंदीतील माणुसकी


सोमेश्वरनगर दि २७

कोरोना व्हायरस जगभरात थैमान घातला आहे .भारतामध्ये लॉक डाऊन करण्यात आला आणि आता २१ दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे देशाची पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला आवाहन केले आहे की आपण घरात  रहावे व स्वतःची काळजी घ्यावी घरातून बाहेर पडू नये विनाकारण रस्त्यावर ती फिरू नये.आज संपूर्ण भागामध्ये जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये खेडोपाडी या संचारबंदीतही योग्य ती अंमलबजावणी हवी व जनते विनाकारण बाहेर पडू नये ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त  ठेवला गेला मागील काही दिवसांपासून पोलीस अहोरात्र आपल्या जनतेच्या सेवेसाठी सज्ज आहेत संचारबंदीमुळे हॉटेल्स चहाचा टपऱ्या बंद आहेत पोलीस हे आपल्यासारखेच माणसे त्यांना तहान भूक लागतेना ? 
वाघळडीतील उदय किर्वे व संतोष धुमाळ या ग्रामस्थांनी माणूसकी भान राखत पोलीस कर्मचारी करत असलेल्या अहोरात्र कष्ट लक्षात घेत स्वतच्या घरातून चहा व बिस्किट देत एक संचारबंदीला माणुसकी दर्शन घडवून आणले.
आज कोेरोणा व्हायरसच्या पार्श्वभूमीवर  जनतेच्या सेवेसाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी ,पोलीस पत्रकार, पेट्रोलपंप कर्मचारी अहोरात्र झटतात  सलाम त्यांच्या कार्याला .
To Top