सोमेश्वरनगर दि 27
सोमेश्वरनगर नजीक असणाऱ्या सोरटेवाडी येथील युवकाला आज दुपारी तातडीने पुण्याला नायडू हॉस्पिटल येथे हलवण्यात आले होते, याबाबत आरोग्य विभागाकडून या तरुणांचा रिपोर्ट उपलब्ध झाला नाही.
तीन दिवसापूर्वी पुणे येथून हा युवक आपल्या गावी आला होता, आज सकाळपासून त्याला त्रास होऊ लागल्याने आज दुपारी त्याला पुणे येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
सोमेश्वरनगर वासियांनो सावधान कोरोना आता तुमच्या उंबऱ्यावर
चीन इटली दुबई मार्गे हा कोरोना पुण्यात आला, पुणे लॉकडाउन झाल्यामुळे कामानिमित्त पुण्यात असणाऱ्या नागरिकांनी आता ग्रामीण भागाचा आश्रय घेतला आहे. या नागरिकांना त्याच वेळी कोरेनटाईन करण्याची गरज असताना याबाबत अनेक ग्रामपंचायतीने आपले हात झटकले आहेत. वाकी, मुरटी, मुरूम आणि आता सोरटेवाडी येथे या आजाराने डोके वर काढले होते. सोरटेवाडी वगळता या सर्व गावातील पेसेंट निगेटिव्ह निघाले आहेत.
ग्रामीण भागात अजूनही वर्दळ
संचारबंदीचा ग्रामीण भागात कोणताच परिणाम दिसून येत नाही, सगळीकडे नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू आहे. लोकांची ये जा सुरू आहे. नागरिक बँक आणि पेट्रोल पंप सारख्या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने गर्दी करत आहेत
सोरटेवाडी येथील हलवण्यात आलेल्या युवकाला नायडू हॉस्पिटल या ठिकाणी ठेवण्यात आले असून याबाबत कोणताही रिपोर्ट आला नसून तो अजून संशयीत आहे.
-प्रमोद काकडे- आरोग्य सभापती जि प पुणे