सोमेश्वरनगर दि 27
सोमेश्वरनगर नजीक असणाऱ्या सोरटेवाडी येथील युवकाला आज दुपारी तातडीने पुण्याला नायडू हॉस्पिटल येथे हलवण्यात आले होते, मात्र त्याचे रिपार्ट निगेटिव्ह आल्याने परिसराने सुटकेचा निःस्वास सोडला.
तीन दिवसापूर्वी पुणे येथून हा युवक आपल्या गावी आला होता, आज सकाळपासून त्याला त्रास होऊ लागल्याने आज दुपारी त्याला पुणे येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
सोमेश्वरनगर वासियांनो सावधान कोरोना आता तुमच्या उंबऱ्यावर
चीन इटली दुबई मार्गे हा कोरोना पुण्यात आला, पुणे लॉकडाउन झाल्यामुळे कामानिमित्त पुण्यात असणाऱ्या नागरिकांनी आता ग्रामीण भागाचा आश्रय घेतला आहे. या नागरिकांना त्याच वेळी क्वारंटाइन करण्याची गरज असताना याबाबत अनेक ग्रामपंचायतीने आपले हात झटकले आहेत. वाकी, मुरटी, मुरूम आणि आता सोरटेवाडी येथे या आजाराने डोके वर काढले होते. या सर्व गावातील पेसेंट निगेटिव्ह निघाले आहेत.