हातावरती पोट असणाऱ्यांना किराणा मालाचे वाटप.



सोमेश्वरनगर दि २८
सर्व सामान्य जनतेच जीवन दैनंदिन कामावर अवलंबून असत. परंतू कोरोना या आजाराने पार्श्वभूमीवर भारत बंदचा फटका हातावर पोट असलेल्या अनेक कुटुंबाना बसला आहे. रोजगार बंद झाल्यामुळे घरातील किराणा कसा भरायचा हा प्रश्न उभा राहिला. यासाठी वाघळवाडी आणि करंजेपूल येथील मित्रमंडळी एकत्र येऊन अश्या गरजू कुटुंबाना सामाजिक बांधिलकी जपत घरपोच किरणामाला दिला.
यामध्ये विधवा, परितकत्या , ज्यांना आधार नाही अश्या निराधार कुटुंबाना मदत करण्यात आली आहे. वाघळवाडी गावातील चाळीस तर करंजेपूल मधील दहा कुटुंबाना गहू, तांदूळ, मसाला, डाळी, साखर, तेल असा किराणा देण्यात आला. या मदतीसाठी समर्थ ज्ञानपीठचे अध्यक्ष अजिंक्य सावंत, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कृष्णा कोळेकर, उपसरपंच जितेंद्र सकुंडे, राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते ऋषि गायकवाड, व्यावसायिक जमीर आत्तार, परेश.ज.म, हायकोर्ट वकील आनंद सकुंडे, ग्रामपंचायत सदस्य हेमंत गायकवाड, समर्थ कॉमप्युटरचे योगेश सोळस्कर, प्रा.राहुल खरात, अजित वाघमारे, उद्योजक अभिजित पवार, आकाश सावळकर, नवनाथ चोरमले,चैतन्य सावंत, विकास सावंत  व्यावसायिक सुरज शिंदे यांनी मदत केली. तसेच अश्या गरजू कुटंबाचा शोध घेऊन गावातील ग्रामस्थांनी मदत करावी असे आवाहन करण्यात येत आहे. 

रोज कामाला जात होतो त्यामुळे घरात खायला तरी मिळत होत. आता सगळीकड बंद असल्याने कामाला जाता यायना. त्यामूळे घरात सगळी कायबी शिल्लक नाय. तुम्ही देवासारख धावून आला.
- एका महिलेने बोलून दाखवलेली व्यथा 

मी एकटा राहतो. जिथे स्वयंपाकी म्हणून काम करतो. तिथे जेवण मिळत होत. पण ,आता सगळंच बंद असल्याने काम नाही. घरात काही शिल्लक पण नाहीये. दोन दिवस उपाशी आहे.
- करंजेपूल येथील आचारी
To Top