उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्रकार महेश जगताप यांचा फोन



सोमेश्वरनगर   दि 28

सद्या राज्यातील पेट्रोल पंप सुरू असून याच ठिकाणावरून कोरोना आजाराचा फैलाव होऊ शकतो यासाठी पेट्रोल पंप बंद ठेवावेत अशी विनंती बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश जगताप यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोनद्वारे केली. 
         राज्यात संचारबंदी असताना पेट्रोल पंपावर फक्त अत्यावश्यक  सेवांमधील व्यक्तींना पेट्रोल देणायचे राज्य शासनाने जाहीर केले होते. मात्र दि 26 रोजी राज्य शासनाने पेट्रोल पंप सुरू करण्याचे आदेश दिले. त्यामुळे राज्यातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी शेकडोंच्या संख्येत पंपावर गर्दी उसळली, ही गर्दी आजाराला आमंत्रण देणारी ठरत आहे. तसेच   तसेच पेट्रोल आणि डिझल भरणाऱ्या कामगारांचे पण आरोग्य धोक्यात आले आहे. 
           याबाबत पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन करून गर्दी टाळण्यासाठी पंप बंद ठेवण्याची विनंती केली. यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्हाधिकारी यांना पण सांगण्यात आले आहे, फक्त शेतीच्या कामाला डिझेल दिले जाईल. पेट्रोल कोणालाही देण्यात येऊ नये.
To Top