सोमेश्वरनगर दि २७
बारामती तालुक्यातील थोपटेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सावंतवस्ती, बानाजीनगर आणि नलवडेवस्ती या ठिकाणी पुणे आणि मुंबई वरून आलेले ऐकून १७० लोकांना आज शिक्के मारून होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय ग्रामपंचायत थोपटेवाडी आणि आरोग्य विभागाने घेतला आहे. आज या १७० लोकांच्या घरी जाऊन त्यांचा हातावर शिक्का मारण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस पाटील नितीन थोपटे यांनी दिली.
यासाठी ग्रामपंचायत सदस्य आणि आरोग्य विभाग कर्मचारी धावपळ सुरू आहे.
संपून राज्य लॉकडाउन झाल्यावर खेडेगावातून कामानिमित्त गेलेले लोकांनी आता ग्रामिण भागाचा आश्रय घेतला आहे. मात्र हे सर्व लोक १०ते १२ दिवसापूर्वीच गावाला अलेली आहेत. त्याच वेळी त्यांना कोरेनटाईन करणे गरजेचे होतं.
थोपटेवाडी गावातील थोपटेवाडी गावठाण, सावंतवस्ती, बानाजीनगर आणि नलवडेवस्ती याठिकाणावरील बाहेरून आलेल्या १७० जणांना होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
COMMENTS