बारामती पोलीस हल्ला प्रकरण 20 जण अटकेत

Pune Reporter
बारामती पोलीस हल्ला प्रकरण
 20 जण अटकेत


बारामती  दि  28

 बारामती शहरातील जळोची (बारामती) येथे संचारबंदीसाठी  गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला करणाऱ्या 20 जणांना बारामती शहर पोलिसांनी अटक केली आहे.
         ज्ञानेश्‍वर बाबुराव वाकोडे, अंकुश बाबुराव वाकुडे, अक्षय हिंदूराव ढवळे, अश्‍विनी अशोक ढवळे, वृषाली किशोर ढवळे, वर्षा अर्जुन ढवळे, हिरकणी हिम्मत ढवळे, चांदणी अंकुश वाकुडे, मंगल बाबुराव वाकुडे, अशा मोहन गोंडे, माया दयावंत ढवळे, जया हिंदुराव ढवळे, विजय हिंदुराव ढवळे, अर्जुन हिम्मत ढवळे, किशोर हिम्मत ढवळे, चेतन अरूण साळुंखे, हिंदूराव जयराम ढवळे, हिम्मत जयराम ढवळे, साकाबाई हिम्मत ढवळे, गौरव अरूण साळुंखे (सर्व रा. जळोची) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर पोलीस कर्मचारी पोपट बुधा कोकाटे यांनी फिर्याद दिली आहे.
बारामती शहरातील जळोची येथे शुक्रवारी (दि. 27) चार वाजण्याच्या सुमारास पोलीस पथकाला मारहाण झाली. त्यामध्ये पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, सहायक निरीक्षक अश्‍विनी शेंडगे, पोसई गंपले, पोसई शेलार पोलीस नाईक काजळे, काळे, कोकाटे, पाटील, नाळे, होमगार्ड धायगुडे जखमी झाले आहेत.
To Top