शेतकऱ्यांना दूध रस्त्यावर फेकून देण्याची वेळ

Pune Reporter

शेतकऱ्यांना दूध रस्त्यावर फेकून देण्याची वेळ 

सोमेश्वरनगर, दि  29

कोरोना मुळे राज्यातील सर्वच बाजारपेठा थंडावल्या असून आता याचा परिणाम शेतकऱ्यांच्या शेतमालावर दिसू लागला आहे. शेतातून उत्पादित झालेल्या शेतमालाला बाजारपेठांच उपलब्ध होत नसल्याने लाखो रुपयांचा भाजीपाला नासून चालला आहे तर दुसरीकडे दूध डेअऱ्यांकडून शेतकऱ्यांचे दूध नाकारले जात असल्याने आता शेतकऱ्यांवर रस्त्यावर दूध ओतून देण्याची वेळ आली आहे.
 दूध संस्थाआठवड्यातून एक-दोन वेळा शेतकऱ्यांचे दूध नाकारू लागल्या आहेत. सरकाने त्वरित अडचणी न सोडविल्यास दूधव्यवसायच मोडकळीस येणार आहे. राज्यभरातील दूधसंस्थांनी आठवड्यातून एक किंवा दोन वेळा दूधसंकलन बंद ठेवण्यास सुरवात केल्याने
शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशात काही संधीसाधू दुधाचे भाव पाडण्याच्या भूमिकेत असून दरावर सरकारी
यंत्रणेचे नियंत्रण नाही. यामुळे दुधाचे प्रतिलिटर ३२ रुपये असलेला दर वीस येणार अशी चर्चा आहे. 

संदीप जगताप अध्यक्ष बारामती दूध संघ-  
दूध संघाने अथवा दूध संस्थानी शेतकऱ्यांकडून घेतलेले दूध पुढे मागणी नसल्यामुळे याचा फार मोठा फटका संस्थाना बसत आहे. घेतलेले दूध पुढे रन झाले नाही तर दूध संस्था तोट्यात जाण्याची शक्यात आहे. 



दत्ता माळशिकारे- शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना पुणे जिल्हा कार्याध्यक्ष
जगात कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. दोन दोन दिवस दूध घेतले जात नाही. याबाबत दूध विक्री व्यवस्थापन सुरळीत व्हावे. शासनाने देखील याबाबत लक्ष घालून शेकाऱ्याचा शेतमाल व दुधाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत अन्यथा शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्याशिवात राहणार नाही.
To Top