-दुकानदारांकडून कृत्रिम दरवाढ
सोमेश्वरनगर दि २९
जगभरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे जगामध्ये असंख्य बळी या आजारामुळे गेले आहेत जगातील विविध देशांच्या पंतप्रधानांनी ठरावीक कालावधीसाठी लॉक डाऊन केले आहे .सर्व नागरिकांना सक्तीने घरात राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .
त्यामुळे नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यास सुरुवात केली आहे दि१५ एप्रिलपर्यंत संपूर्ण भारत देशामध्ये संचारबंदी आहे या आदेशामध्ये वाढ केली जाण्याची चिन्हे असल्याच्या कारणाने नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर संकलन करण्यास सुरुवात केली परिणामी ग्रामीण भागामध्ये असलेले तुटपुंजे किराणा दुकाने यामध्ये असलेला माल संपला आहे किंवा जिथे तो उपलब्ध आहे तेथे कृत्रिम दरवाढ झाल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे हातावरती पोट असणाऱ्या रोजंदार मजुरांचे हाल झाले आहेत त्यामुळे प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे असे सर्वसामान्य नागरिकांकडून मागणी होत आहे .
चढ्या दराने विक्री
-तेल डबा मागे २०० रुपायांची
दरवाढ
-शेंगदाणा किलो मागे ४० रुपायाचे दरवाढ.
- बिस्किट उपलब्ध नाहीत.