को-होळे बु॥ दि;२९
कौटुंबिक वादातून मुलाने पित्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडून स्वत:वरही गोळीबार केल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील को-हाळे बुद्रूक येथे रविवारी (दि. २९) घडली. बारामती तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक दिपक खोमणे यांच्याकडून हा प्रकार घडल्याची प्रथमदर्शनी माहिती मिळत आहे. या घटनेत त्यांचे वडील धनंजय धोंडीबा खोमणे (वय ७५) हे गंभीर जखमी झाले आहेत.
को-हाळे बुद्रूक येथील शेतात रविवारी दुपारी हा प्रकार घडला. कौटुंबिक व संपत्तीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. वडील धनंजय यांच्यावर पिस्तुलातून गोळी झाडल्यानंतर दिपक खोमणे यांनी स्वतःवरही गोळी झाडून घेतली आहे. दोघांना बारामतीत उपचारासाठी हलवण्यात आले आहे.