पारधी समाजातील २० वंचित कुटुंबांना किराणा मालाचे वाटप .

Pune Reporter
पारधी समाजातील २० वंचित कुटुंबांना किराणा मालाचे वाटप .

सोमेश्वरनगर दि;२९

 सध्या सर्वत्र कोरोना विषाणुमुळे भीतीचे सावट आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागू झालीय. प्रत्येक गावामध्ये पारधी समाजातील जे  बेघर, ज्यांना आश्रय नाही अशा लोकांची संचारबंदीमुळे उपासमार होताना दिसत आहे.
ही बाब महाराष्ट्र राज्य सराफ असोसिएशनचे उपाध्यक्ष  किरण आळंदीकर यांच्या लक्षात आल्यानंतरही बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्ष महेश जगतापाशी बोलून दाखवली दोघांनी एकत्रित येत सोमेश्वरनगर परिसरातील  पारधी समाजाती २०कुटुंबांना किराणा मालाचे वाटप केले या किराणा मालामध्ये तांदूळ, साखर ,रवा, डाळ,चहा पावडर, मीठ, तेल, शेंगदाणे तिखट व इतर वस्तु होत्या. यावेळी अॅडव्होकेट  नवनाथ भोसले ,पत्रकार - युवराज खोमणे, विनोद गोलांडे, तुषार धुमाळ आदी परिश्रम घेतले.

To Top