सोमेश्वरनगर परिसराला अवकाळी पावसाने झोडपले

Pune Reporter
सोमेश्वरनगर परिसराला अवकाळी पावसाने  झोडपले

-शेतकरी हवालदिल मोठ्या प्रमाणावरती शेतीचे नुकसान .

सोमेश्वरनगर दि :२९

सोमेश्वरनगर परिसराला आज दुसऱ्यांदा वादळासह पावसाने झोडपले, शेकडो झाले उन्मळून पडली तर शेकडो एकरांवरील गव्हाच्या पिकाचे नुकसान झाले आहे.
      सध्या जगामध्ये कोरोना व्हायरसने धुमाकुळ घातला ही सर्व जनता आपआपल्या घरांमध्ये त्या व्हायरसच्या  भीतीने बसली आहे त्यातच मार्च महिन्याचा शेवट सुरू आहे सोमेश्वरनगरकर तीव्र उकाडय़ाने त्रस्त आहेत आणि त्यातच दि २९ रोजी दुपारी चार साडेचारच्या दरमान अवकाळी पावसाने विजांच्या गडगटासह तुफानी वाऱ्या बरोबर   सोमेश्वरनगर परिसराला  झोडपले आहे .
वरुन आस्मानी संकट आणि खाली जमिनीवर ती कोरोना व्हायरसची भीती यामुळे शेतकर्यांची कंबरडे पूर्णपणे मोडले आहे .
एकीकडे व्हायरसच्या भितीमुळे शेतांमध्ये शेत मजूर कामावर येत नाहीत व काढणीला आलेल्या गव्हाला यंत्रे उपलब्ध होत नाहीत .त्यात हा अवकाळी पाऊस झाला असून यंदा सोमेश्वरनगर परिसरातील गव्हाचे  मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
To Top