छत्तीसगड च्या मजुरांना सोमेश्वरनगर वासीयांची मदत
सोमेश्वरनगर दि 30
सोमेश्वर परिसरातील गरजू कुटुंबाना किराणा देण्यासाठी अनेक हात सर्सावले आहेत. कोरोना पार्श्वभूमीवर भारत बंदचा फटका मुरुम येथे सध्या वास्तव्यास असलेल्या छत्तीसगडवरुन आलेल्या आठ बांधकाम मजुरांना बसला आहे. बांधकाम बंद असल्याने रोजगार बंद आहे. त्यामूळे घरातील सर्वच साहित्य संपल्याचे समजताच सोमेश्वर परिसरातील मित्रमंडळी अश्या गरजू कुटुंबाना मदत करण्यासाठी एकत्र आले.
मुरुम येथे वास्तव्यास असलेल्या आठ कुटुंबाना बाजरी, गहू, तेल, डाळी, तांदुळ,मिठ, मसाला, हळद असा किराणा देण्यात आला. गेल्या आठवड्यात वाघळवाडी आणि करंजेपूल येथील पन्नास कुटुंबाना किराण्याची मदत करण्यात आली होती. त्यानंतर अनेकांचे रोजगार नसल्याने आर्थिक परिस्थिती नाजुक बनल्याचे निदर्शनास आल्याने सोमेश्वर परिसरातील मित्रमंडळी, पत्रकार मित्र, पोलिस मित्र अश्या अनेकांनी एकत्र येत गरजू कुटुंबाना मदत करण्याचे ठरवले. यातुन ' आपत्कालीन मदत' असा व्हॉट्सअॅप ' ग्रुपच्या माध्यमातून कोरोना'मुळे बंद असताना एकमेकांच्या संपर्कात राहुन मदत करत आहेत. काल केलेल्या मदतीच्या आव्हानास प्रतिसाद देत हर्षद वाबळे, सोमेश्वर आय सू चे डॉ.अनिल कदम, देविदास सावळकर, प्रदिप पवार,रोहिदास कोरे, गोरख लेंबे, संतोष सकुंडे, संतोष अनपट, आनंद सकुंडे यांनी रक्तदान शिबिरासाठी, नाव प्रसिध्द न करण्याच्या अटीवर एका शिक्षकांनी अशी बावीस हजार आर्थिक मदत संकलित झाली.
सोमेश्वर परिसरातील अनेक कुटुंबांना मदतीची गरज असुन आपण या उपक्रमात सहभागी होऊ शकता.