पत्रकारा तु झटतोस समाजासाठी, समाजाला तुझे काय घेण...?
* स्वत:चा जीव धोक्यात घालुन कोरोना महामारीत सुद्धा इत्यंभुत बातम्यांचे कवरेज सर्वांना देतोस...शासनाला तुझे काय घेण...।।
* चांगल्या वाइटाला वाचा फोडताना,गावगूंडांच्या धमक्या आणी जिवघेणे हल्ले अंगावर घेतोस...समाजाला तुझ काय घेण...।।
* लाकडाऊन काळात पत्रकारांना वार्यावर सोडून सर्वांना अर्थसहाय्याची घोषणा करणार्या...शासनाला तुझे काय घेण...।।
* खोट्या थापा आणी आश्वासनांच्या बाता मारून स्वत:च्या प्रसिद्धीसाठी पत्रकार परिषदा बोलावणारे पुढारी व मंत्र्यांना... तुझे काय घेणे...।।
* पत्रकारास ना पगार, ना मानधन तरीही झटतोय रात्रंदीवस बातम्यांच्या कवरेज साठी...शासनाला तुझे काय घेणे...।।
* पत्रकार संरक्षण कायदा लागु केल्याचा बागुलबुवा करणार्या सरकारने पत्रकारांवर हल्ले झाल्यानंतर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत हल्लेखोरांवर गुन्हे दाखल केले का...? शासनाला तुझे काय घेण...।।
* लेखणीचा चौथा स्तंभ आणी समाजाचा आरसा असणार्या पत्रकारास शासनाकडून कायमच वाळीत टाकण्याचा प्रयत्न करणार्या...शासनाला तुझे काय घेणे...।।
* अन्याय, अत्याचाराविरूद्ध निर्भिडपणे आवाज उठवून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार्या पत्रकारांवर जेव्हा हल्ले होतात तेव्हा समाज झोपेचे सोंग घेतो... समाजाला तुझ काय घेण...।।।
* छटाकभर जाहीरातींची लालुच दाखवून पत्रकारांस आपल्या हातातले बाहुले समजणार्या सर्व स्तरातील राजकीय, सामाजिक पुढार्यांना ... पत्रकारा तुझ काय घेण...।
* पत्रकारसुद्धा माणुस आहे. त्यालाही कुटुंब, प्रपंच आहे. जग मरणाच्या उंबरठ्यावर उभे असताना स्वत:च्या जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता अहोरात्र बातम्यांचे कव्हरेज देणार्या पत्रकारांसाठी लाॅकडाऊन मध्ये कसल्याही सुविधा व योजना लागु न करणार्या ... मोदी,...ऊद्धव..जी... पत्रकारांच तुम्हाला काय घेण.
* पत्रकारा तु झटतोस समाजासाठी, समाजाला तुझ काय घेण..।।
सुधाकर तुकाराम बोराटे.
( वार्ताहार. इंदापूर, जि. पूणे.)
( 9561190332 ).
====================================
—————————————————————————