सोमेश्वरनगर दि १
कोरोनाने राज्यात थैमान घातले असतानाच लॉकडाऊनमुळे शेकडो कुटुंबे उघड्यावर आली आहेत.
सोमेश्वरनगर परिसरातील गावांतील काही नागरिक एकत्र येत संचारबंदीमुळे उपासमार होत असलेल्या तालुक्यातील गरजू लोकांना मदतीचा हात दिला आहे.
यामध्ये घरगुती जीवनावश्यक किराणा वस्तू बरोबर ताज्या भाजीपाला अशा वस्तूू देण्यात आल्या.मागील काही दिवसांपासून संचारबंदीमुळे परिसरातील कामधंदा बंद झाल्याने या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही मदत मिळाल्याने काही दिवसांचा प्रश्न मिटला, असे या कुटुंबातील सदस्यांनी सांगितले.
यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, नायब तहसीलदार धनंजय जाधव, महादेव भोसले, मंडलअधिकारी एम ती सय्यद,संजय माने,करंजे तलाठी दादा आगम,कोतवाल तानाजी जाधव आणि अविनाश पाटोळे यांनी विशेष काळजी घेऊन त्या कुटूंबियांना मदत पोच केली असून इतुन पुढेही अशीच मोल मजुरी करणाऱ्या कुटूंबाची यादी काडून त्यानाही जीवनावश्यक वस्तू पोच करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.