वडगाव निंबाळकर पोलीसाकडुन संचारबंदी उल्लंघन कारणाने १० जणांवर गुन्हे दाखल

Pune Reporter
संचारबंदीत अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना सॅनिटायझरचे वाटप
वडगाव निंबाळकर पोलीसाकडुन संचारबंदी उल्लंघन कारणाने १० जणांवर गुन्हे दाखल

सोमेश्वरनगर  दि  २ एप्रिल

काल १ एप्रिल पासुन वडगाव निंबाळकर पोलीसानी रस्त्यावर  विनाकारण फिरुन संचार बंदीचे उल्लंघन केल्याबद्दल वाघळवाडी ,कन्नडवस्ती ,मोरगाव , चोपडज ,सुपे या ठिकाणच्या लोकाना मारहाण न करता गुन्हे दाखल केले आहेत* वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन  चे स पो नि सोमनाथ लांडे यांच्या अधिपत्याखाली पथकाने केलेल्या कारवाईत  हे उन्हे दाखल झाले आहेत वडगाव निंबाळकर पो स्टे गु र नं १३४ , १३५ ,१३६  या गु र नंबर १३७ , १३८ , दिनांक १/४ /२०२० नुसार अनुक्रमे सचीन मुकेश अलगुरे रा- वाघळवाडी ,खन्ना रमेश गागडे ,कन्नड वस्ती वाघळवाडी ,विलास बाजीराव धायगुडे,तरडोली ,दत्तात्रय छगन गाडेकर ,विपुल मच्छिंद् गाडेकर ,चोपडज या सर्वावर  राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम ५१ (ब ),महाराष्ट्र कोवीड १९ उपाययोजना नियम २०२० चे नियम ११ नुसार गुन्हे दाखल केले असुन सर्वांच्या मोटारसायकली देखील जप्त केल्या आहेत.दोन दिवसात १० जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत 

कारवाई वेगात करणार.. ए पी आय सोमनाथ लांडे

      केन्द्र व राज्य सरकार च्या धोरणानुसार सध्या देशभरात गंभीर परिस्थीती असताना जर कुणी विनाकारण घराबाहेर पडले तर कडक कारवाई करणार असुन अटकेचे सत्र चालुच राहील  अशी माहीती वडगाव चे स पो नि सोमनाथ लांडे यानी दिली .
अटकेचे गांभीर्य आयुष्यावर परिणाम  करणारे .. ॲड गणेश आळंदीकर

         कोणत्याही गुन्हयामधे व्यक्तीला अटक झाली तर त्याच्या आयुष्यावर मोठा परिणाम होतो.बारामती न्यायालयाने या अगोदर तीन तीन दिवस कैदे ची शिक्षा काहीना सुनावली आहे .. अशा अटकेने भविष्यात चारीत्र्य पडताळणी,पासपोर्ट व पुन्हा एखादा गुन्हा दाखल झाला तर त्या व्यक्तीला Habitual offender म्हणून गृहित धरले जाईल .त्याचप्रमाणे शस्त्र परवाना वै बाबीत देखील अडचणी निर्माण होतील . अशा प्रकारे त्या व्यक्तींचे मोठे नुकसान होवु शकते .. त्यामुळे एकवेळ मार परवडला पण गुन्हा नव्हता दाखल व्हायला पाहीजे..असे वाटेल .. त्यामुळे कायदेशीर बाबीपासुन ..वाचण्याकरिता प्रत्येकाने कोणत्याही परिस्थीतीत  आपत्ती प्रतिबंधक . कायदा २००५ कलम ५१ ब अंतर्गत गुन्हा दाखल  होणार नाही याची काळजी घ्यावी.असे ही जेष्ठ वकिल ॲड गणेश आळंदीकर यानी सांगीतले.
To Top