मास्क न लावता बाहेर फिरणाऱ्या 38 नागरिकांवर गुन्हा दाखल

Pune Reporter
मास्क न लावता बाहेर फिरणाऱ्या 38 नागरिकांवर गुन्हा दाखल

सोमेश्वरनगर  दि  १० एप्रिल

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत विनाकारण मास्क न लावता बाहेर फिरणा-या ३८ जणांवर वडगाव निंबाळकर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. 
         मा.जिल्हाधिकारी सो पूणे यांचे काल रोजीचे सुधारित आदेशाचे पालन न करणाऱ्या व मास्क न लावता बाहेर फिरणारे  एकुण 38 नागरिकांवर भा द वी 188 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा व कोविड कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. 
       कोणत्याही कामासाठी सार्वजनिक ठिकाणी येताना सर्वांनी मास्क लावावे. तसेच कोणीही विनाकारण बाहेर फिरु नये असे आवाहन वडगांव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सपोनि सोमनाथ लांडे यांनी केलेआहे. 
To Top