वडगाव निंबाळकर येथे २५ गरजू कुटुंबांना वस्तूंचे वाटप

Pune Reporter
वडगाव निंबाळकर येथे २५ गरजू कुटुंबांना वस्तूंचे वाटप

वडगाव निंबाळकर  दि  ९  एप्रिल

वडगाव निंबाळकर ता. बारामती येथिल श्री छत्रपती जाणता राजा युवा प्रतिष्ठान च्या माध्यमातून येथिल २५ गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
बहुतांशी कुटुंब बांधकाम व्यवसायिक आहे लॉक डाऊनमुळे ठेकेदार गावी निघून गेले अडकलेल्या मजूर कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी येथील प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुढाकार घेऊन पंचवीस कुटुंबांना तांदूळ, पीठ, साबण, तेल, डाळ, अशा जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले यावेळी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे तलाठी रविंद्र कदम ग्रामविकास अधिकारी शहानूर शेख, आशा सेविका सुचित्रा गायकवाड, अनुराधा काकडे पत्रकार चिंतामणी क्षिरसागर, संतोष भोसले, प्रसाद दरेकर, अमोल किंगरे, शिवदत्त चव्हाण उपस्थित होते.

मदतीसाठी ग्रामस्थांना आवाहन...
गावात 120 कुटुंब बांधकाम मजुर आहे. यांना रेशनचे धान्य मिळत नाही त्यामुळे लोकसहभागातून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जाणार आहे. यासाठी ग्रामस्थांनी मदत करावी असे आवाहन कोरोना नियंत्रक समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
मदतीसाठी तलाठी ग्रामविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
To Top