सोमेश्वरनगर या ठिकाणी दारूचा साठा जप्त
सोमेश्वरनगर दि ९ एप्रिल
सोमेश्वरनगर ता बारामती नजीक सोरटेवाडी गावाच्या हद्दीत वडगाव निंबाळकर पोलिसांनी छापा टाकून १ हजार ९५० रुपयांची इंग्लिश दारू जप्त केली.
याबाबत रमेश व्यंकट पवार यांच्यावर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करंजेपुल येथील निराडाव्या कालव्याच्या लगत एका पतसंस्थेच्या पाठीमागे विहिरी लगत मकेच्या शेतात दारूचा काळा बाजार चालू असल्याची पोलिसांना कल्पना मिळते यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून १५ इंग्लिश दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. याबाबत पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेंद्र फणसे, पोलीस हवालदार भोई आणि पोलीस जमादार लोहकरे यांनी ही कारवाई केली