नीरा दि:९ एप्रिल
बारामती कोरोनाचे रुग्ण आढळल्याने व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सावधगिरीचा उपाय म्हणून नीरा गांव शुक्रवार (दि.१०) ते रविवार (दि.१२) असे तीन दिवस पुर्ण बंद राहणार आहे.फक्त हॉस्पिटल व मेडिकल दुकाने ही अत्यावश्यक सेवा चालू राहतील.* हे वगळता लॉक डाऊन करण्यात येणार असल्याने या तीन दिवसांत किराणा दुकाने, भाजी मंडई, फळ विक्री, शेतीपूरक खते, बिबीयाने व औषध दुकाने, मटण, चिकन, अंडी विक्रेत्यांची आदी दुकाने पुर्ण वेळ बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने केले आहे.
नीरा परिसरातील गुळुंचे, कर्नलवाडी, राख, नावळी, पिंपरे (खुर्द), पिसुर्डी, जेऊर, मांडकी, वाल्हा, बारामती तालुक्यातील निंबुत, खंडोबाचीवाडी, गडदरवाडी, वाघळवाडी, सोमेश्वर नगर तर सातारा जिल्ह्यातील पाडेगाव फार्म, पिंपरे (बुदृक), बाळुपाटलाची वाडी, आदि गावातील ग्रामस्थांनी पुढिल काळात नीरा शहरात येण्याचे टाळावे.कोणत्याही कारणा शिवाय येऊ नये. फक्त दवाखाने व मेडिकल सुरू आहेत. डॉक्टरांची ओ.पी.डी फक्त सकाळी ९ ते १२ या वेळेतच सुरू राहील.इमर्जंसी असल्यास आपल्या फॅमिली डॉक्टरांना फोन करूनच नीरेत यावे,डॅक्टर ही पुर्णवेळ उपलब्ध होतीलच असे नाही. कृपया सहकार्य करावे.
घरीच रहा आपण सद्या फक्त स्वत:च्याच घरात सुरक्षित आहात.
घरा बाहेर कोरोना आपली वाट पाहत आहे.