-आतापर्यंत ३९ जणांवर गुन्हे दाखल
सोमेश्वरनगर दि ९ एप्रिल
बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनने काल (दि.८/४) १७ जणांवर तर आतापर्यंत ३९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच ४३ जणांच्या मोटारसायकल जप्त करून पोलीस स्टेशनला लावण्यात आलेल्या आहेत. आजपासून जो कोणी नागरिक मास्कचा वापर करणार नाहीत त्यांच्याविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
काल विविध गावच्या नागरिकांवर संचारबंदीचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर 188, 269, 270 तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 52 (ब), महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम 2020 चे नियम 11 साथीचे रोग निबंधक कायदा कलम 2,3,4 प्रमाणे नितीन सकाटे रा.मुढाळे, राहुल खराडे रा.लाटे, बापू कोळेकर रा.पळशी, अमर साळवे रा. वडगाव, प्रतिम कारंडे रा. वडगाव, प्रदयुम शुक्ला रा. (मूळ बडोरा उत्तर प्रदेश) (सध्या वाघळवाडी), प्रजवलीत अहिवळे रा. निंबुत, विनोद टकले रा.कानाडवाडी, सागर होळकर रा. होळ, अनिल भंडलकर रा.मुरूम, सुनील जाधव, अजित जाधव दोघेही रा. साखरवाडी, सीताराम कदम रा. वीर, आदेश घाडगे, ऋत्विक यादव, विशाल मोरे, विकास शिंदे चौघेही रा.वाघळवाडी या १७ जणांवर काल गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
हे सर्व आरोपी मानवी जिवीतास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरवीण्याचा संभव असलेली हयीगयीची व घातकी कृती करीत असताना व मा.जिल्हा अधिकारी पुणे आपत्ती व्यवस्थापन शाखा यांचे कडील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण जिल्हा अधिकारी कार्यालय पुणे क्र. जी.आ.व्य/कोरोना विषाणुन /156/2020 पुणे दि. 22/03/2020 रोजीच्या आदेशान्वये दिलेल्या रितसर आदेशाची अवेज्ञा करीत असताना मिळुन आलेने त्याचे विरुध्द मजकुराचे दिले फिर्यादी वरुन गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला.