सभासदांच्या सर्व उसाचे गाळप करणार, अफवांवर विश्वास ठेवू नये- पुरुषोत्तम जगताप

Pune Reporter
सभासदांच्या सर्व उसाचे गाळप करणार, अफवांवर विश्वास ठेवू नये- पुरुषोत्तम जगताप


सोमेश्वरनगर   दि  ८  एप्रिल

सोमेश्वर कारखान्याचे गाळप सुरळीत सुरू असून सभासदांच्या सर्व उसाचे गाळप करण्यास संचालक मंडळ कटिबद्ध आहे, असे मत सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केले. 
            आज संचालक मंडळाच्या बौठकीत या व्यतिरिक्त  अनेक निर्णय घेण्यात आले. यामध्ये लॉकडाउन च्या काळात किराणा साहित्याचे दर वाढले, तसेच किराणा मालाची आवकही कमी प्रमाणात होत असल्याने चढ्या भावाने ऊसतोडणी कामगारांना किराणा साहित्य घेणे परवडत नसल्याने दि १ रोजी साडेतीन हजार ऊसतोडणी कुटुंबाना सुमारे १२ लाख रुपयांचे किराणा साहित्य देण्यात आले. याचा दुसरा टप्पा दि १६ रोजी करण्यात येणार असून अशाच प्रकारे ऊसतोडणी कामगारांना किराणा मालाचे वाटप करण्यात आले आहे. तसेच सद्या ऊसतोडणी कामगारांना एक टनाला ५० रुपये कारखाना रोख स्वरूपात देत होता या रकमेत वाढ करून ती १०० रूपये करण्यात आली आहे, तसेच ट्रक व ट्रॅक्टर चालकांना एका खेपेला १०० रुपये देण्यात येत होते ते वाढवून १५० रुपये करण्यात आले आहेत. त्याच बरोबर कारखान्यातील कामगार व अधिकारी यांनी देखील आशा काळात कारखान्याला चांगली साथ दिली असून या सर्व कामगारांना बक्षीस स्वरूपात काहींना काही देण्याचा संचालक मंडळाचा मानस असल्याचे जगताप यांनी सांगितले. सद्या साखर कारखाना व सर्व प्रकल्प सुरळीत सुरू आहेत. आज अखेर कारखान्याने ११.८० च्या सरासरी साखर उतरल्याने  ८ लाख ८ हजार ३०५ में टन उसाचे गाळप केले असून सद्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात १ लाख टनाच्या आसपास ऊस शिल्लक असून हा सर्व ऊस गाळप झाल्याशिवाय कारखाना बंद होणार नसल्याचे जगताप यांनी सांगितले. 

कारखाना बंद होताच सभासद साखर वाटप सुरू
सद्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी सभासद साखर वाटप बंद ठेवण्यात आले आहे, कारखाना बंद झाल्यावर सभासद साखर वाटप सुरू करण्याचा संचालक मंडळाचा विचार असल्याचे अध्यक्ष जगताप  यांनी सांगितले.
To Top