बारामतीतील कोरोना बाधित भाजी विक्रेत्याचा मृत्यू
सोमेश्वरनगर दि ९ एप्रिल
बारामती शहरातील कोरोनाबाधित भाजीविक्रेत्याचा आज पहाटे मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात खळबळ माजली असून आता सर्वांनीच कमालीची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
संबंधित व्यक्तीस अर्धांगवायूचा त्रास होता, त्यांची प्रतिकारशक्तीही कमी होती. त्यांना दवाखान्यात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृतीखालावली होती आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबातील मुलगा, सून व दोन नातींनाही कोरोनाची बाधा झाली आहे. या घटनेमुळे बारामतीत कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. याघटनेनंतरही अजूनही लोक रस्त्यावर फिरत असून लोकांनी प्रयत राहणे गरजेचे असल्याचे प्रशासनाचे मत आहे.