वडगाव निंबाळकर पोलीसांची ३२ गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

Pune Reporter
वडगाव निंबाळकर पोलीसांची ३२ गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

सोमेश्वरनगर   दि  ९ एप्रिल

अहोरात्र कष्ट करत, लॉक डाऊनच्या काळातही २४ तास बंदोबस्त करत, आपणही समाजाच काहीतरी देणं लागतो ही भावना मनात ठेवून वडगाव निंबाळकर पोलिसांच्या वतीने समाजातील गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या वाटप करण्यात आले. 

             आज करंजेपुल पोलीस स्थानकात या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावांमधील गरजूंना या वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश जगताप, वाघळवाडीचे उपसरपंच जितेंद्र सकुंडे, सदस्य हेमंत गायकवाड, पोलीस हवालदार महेंद्र फणसे, ज्ञानेश्र्वर सानप ,पत्रकार तुषार धुमाळ, विनोद गोलांडे आदी मान्यवर उपस्थित होते

To Top