जुन्या फोटोनंतर आता छोटी प्रेमकथा हॅशटॅग लोकप्रिय
सोमेश्वरनगर दि १४ एप्रिल
लॉकडाऊन नंतर सोशल मीडियावर अफलातून हॅशटॅग सुरु झालेत. लोकांना घरी बसल्या बसल्या काहीतरी नवं काम यामुळे मिळाल्याचं दिसतंय. मागच्या पंधरवाड्यात जुन्या फोटोंचा धुमाकूळ सुरू होता. आता या पंधरवाड्यात #छोटी_प्रेमकथा नावाचा हॅशटॅग लोकप्रिय झालाय.
#छोटी_प्रेमकथा या हॅशटॅगने सर्वात जास्त धुमाकूळ देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीवेळेच्या फोटोने घातला आहे. या दोघांची #छोटी_प्रेमकथा 72 तासातच संपल्याचे देशाने पाहीले होते. अनेकांनी आपल्या प्रेमकथेचा शेवट कसा झाला याचे मजेशीर किस्से अगदी छोट्या ओळीत सांगून मोकळे झाले आहेत. ‘लग्नाला नक्की ये’, असे म्हणून आपल्या प्रेमाचा शेवट कसा झाला हे अनेक जण #छोटी_प्रेमकथा मधून व्यक्त होताना दिसत आहे. मेसेज डिलीट करा हे रोजच्या वापरातले वाक्यही मजेदारपणे सांगितले जात आहे. सैराटमधील लंगड्याचे फोटो वापरून #छोटी_प्रेमकथा सांगितली जात आहे. एकूणच छोट्या प्रेमकथेचा फेसबूकवर महापूर आलेला आहे.
COMMENTS