ऊसतोडणी कामगारांना स्वगृही परत आणा- धनंजय मुंडे

Pune Reporter
ऊसतोडणी कामगारांना स्वगृही परत आणा-धनंजय मुंडे

सोमेश्वरनगर   दि  १३ एप्रिल


 सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे लॉकडाऊनमुळे अडकलेल्या ऊसतोड मजुरांना स्वगृही परत आणण्याची कार्यवाही तातडीने करावी अशी मागणी केली आहे.
            धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात म्हनटले आहे की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात सक्तीचे लॉकडाऊन करण्यात आले असून १४ एप्रिल रोजी लॉकडाऊनचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. तसेच राज्यात आणखी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून ३० एप्रिल पर्यंत सरकारने लॉकडाऊनची मुदत वाढविली आहे. बीड,अहमदनगरसह इतर काही जिल्ह्यातील सुमारे दीड लाख ऊसतोड मजूर पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक सिमा भाग व अन्यकाही भागांमध्ये अडकून पडले आहेत. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर काही ठिकाणी साखर कारखान्यानी या मजुरांची निवास, भोजन, इत्यादी व्यवस्था केली तर काही कारखान्यांनी सोडून दिल्यामुळे आपल्या गावी परतत असलेल्या मजुरांना जिल्याच्या सीमांवर अडवून ठेवण्यात आले आहे व त्यांना त्या ठिकाणी विलगिकरणात ठेवण्यात आले आहे.



या मजुरांसमवे असलेल्या जनावरांच्या चा-याचा प्रश्न गंभीर असल्याने त्यांना आपले पशुधन जगवणेही अवघड झाले आहे. ऊसतोड मजूर विविध जिल्ह्यात अडकून पडल्यामुळे त्यांच्या मुळ गावी वयोवृध्द आई-वडील व लहान मुले यांच्या शिवाय कोणीही नाही. हे दोन्हीही घटक हायरिस्क ग्रुप मध्ये असल्याने घरापासून अलग पडलेल्या ऊसतोड कामगारांच्या मनात आपल्या कुटुंबियांप्रती व स्वतः प्रती असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. काही जिल्ह्यात जिल्ह्या प्रशासनामार्फत या कामगारांची तात्पुरती सोय केली गेली असली तरी विखुरलेल्या स्वरूपातील कामगार व कुटुंबियांची संख्या लक्षात घेतल्यास त्यामध्ये प्रयत्न करूनही सुसूत्रता आलेली नाही. अशा गंभीर व भीतीग्रस्त काळात अडकून पडलेले कामगार आणि
वयोवृद्ध आईवडील/लहान मुले यांची ताटातूट झालेली आहे व ही संख्या लाखात आहे. अडकलेल्या ऊसतोड मजुरांची पूर्ण माहिती जिल्हा प्रशासनाकडे आहे. त्यामुळे मानवी दृष्टीकोणातून कोरोना संक्रमण रोखण्यासंदर्भातील सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून, विविध जिल्ह्यात अडकलेल्या सर्व ऊसतोड मजुरांची व त्यांच्या बरोबर असलेल्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी करून, घरातच विलगीकरणात राहण्याच्या अटीवर, प्रशासनाच्या देखरेखीखाली विविध जिल्ह्यात अडकलेल्या ऊसतोड मजुरांना, त्यांच्याबरोबर असलेल्या कुटुंबियांना पशुधनासह त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्याबाबत आपण तातडीने निर्णय घ्यावा, शासनानेच याबाबत पुढाकार घ्यावा, अशी विनंती मुंडे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना केली आहे

To Top