सोमेश्वर कारखान्याकडून 'सोमेश्वर' नावाने सॅनिटायझरची निर्मिती- पुरुषोत्तम जगताप
सोमेश्वरनगर दि ११ एप्रिल
सोमेश्वर कारखान्याने तयार केलेले सॅनिटायझर कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद, बिगर सभासद, ग्रामपंचायती, शासकीय आणि निमशासकीय या सर्वांना ना नफा ना तोटा तत्वावर १०० रुपये लिटर दरात मिळणार असून फार्मसिटीकल कंपन्या वितरक यांना मात्र ते २३६ रुपये प्रति लिटर मिळणार असल्याची माहीत अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
याबाबत कारखान्याने काढलेल्या परिपत्रकात म्हनटले आहे की, कारखाना सभासद, कार्यक्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत)सहकारी संस्था व इतर संस्था यांना कळविण्यात येते की, कोरोना पार्श्वभूमिवर डिस्टीलरीमध्ये हॅण्ड सॅनिटायझर चे उत्पादन सुरु केले असून या उत्पादनास ‘सोमेश्वर सॅनिटायझर' असे नांव देणेत आलेले आहे. हे सॅनिटायझर रोखीने विक्री 'ना नफा ना तोटा' या तत्वावर करणेबाबत संचालक मंडळाने निर्णय घेतला असून या सॅनिटायझरची विक्री किंमत खालीलप्रमाणे
ठेवण्यात आलेली आहे.
१) एक लिटर पॅक
रु.१००/-
२) पाच लिटर पॅक
रु.५००/-
सदरची विक्रीव्यवस्था सोमेश्वर विद्यालय, सोमेश्वरनगर येथे सोमवार, दिनांक १३/०४/२०२० पासून पुढे दररोज सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० या वेळेत
ठेवणेत आलेली आहे.
तरी राज्य व केंद्र सरकारने केलेल्या आवाहनानुसार सोशल डिस्टन्सिग चे काटेकोरपणे पालन करुन आपण हॅन्ड सॅनिटायझर शिस्तीने घेवून जावून कारखाना
व्यवस्थापनास सहकार्य करावे हि विनंती.
राजेंद्र यादव- कार्यकारी संचालक
कारखान्याने निर्मित केलेले सॅनिटायझर हे सोमवार पासून सोमेश्वर विद्यालयात विक्रीसाठी उपलब्द होणार असून सोशल डिस्टस्टिंग ठेवण्यासाठी तीन फुट च्या अंतरावर बॉक्स आखले जाणार असून यासाठी चार काउंटर ची सोय करण्यात आली आहे.