सोमेश्वर कारखान्याकडू 'ना नफा ना तोटा तत्वावर 'मास्क' चे वाटप- पुरुषोत्तम जगताप
सोमेश्वरनगर दि १२ एप्रिल
सोमेश्वर कारखान्याने तयार केलेले सॅनिटायझर कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद, बिगर सभासद, ग्रामपंचायती, शासकीय आणि निमशासकीय या सर्वांना वाजवी दारात सॅनिटायझर वाटप करण्यात येणार आहे. त्याच बरोबर ना नफा ना तोटा तत्वावर 'मास्क' चे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती माहीत अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
आजअखेर सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ८० हजार टनाच्या आसपास ऊस शिल्लक असून येत्या १५ दिवसात सभासदांचा सर्व ऊस गाळप करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर ऊसतोडणी कामगारांना चढ्या भावाने किराणा माल खरेदी करावा लागत होता त्यामुळे कारखान्याने ३५०० ऊस तोडणी कुटुंबांना सुमारे १२ लाख रुपये किमतीचे किराणा साहित्य देण्यात आले आहे. याचा दुसरा टप्पा दि १६ रोजी अशाच प्रकारे ऊसतोडणी कामगारांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
किरकोळ बाजारात सॅनिटायझरचा तुटवडा आणि किमती पाहता कारखान्याने सॅनिटायझर ची निर्मिती केली असून कारखाना सभासदांना व कार्यक्षेत्रातील सर्वच लोकांसाठी अत्यंत वाजवी किमतीत ना नफा ना तोटा तत्वावर हे सॅनिटायझर चे उद्या पासून वाटप करण्यात येणार आहे, याबरोबर खरेदी किंमतीतच मास्क चे देखील वाटप करण्यात येनार असल्याची माहिती अध्यक्ष जगताप यांनी दिली.
गर्दी करू नये
उद्या दि १३ पासून सॅनिटायझर व मास्क ची विक्री करण्यात येणार आहे, सर्वांना त्याची उपलब्धता होणार आहे त्यामुळे सामाजिक अंतर ठेवावे खरेदीसाठी गर्दी करू नये असे आवाहन ही जगताप यांनी केले