वाणेवाडी ग्रामपंचायत देणार ५० टक्के अनुदानावर सॅनिटायझर, जिल्ह्यात आदर्शवत निर्णय
सोमेश्वरनगर दि १२ एप्रिल
बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत वाणेवाडी ने जिल्ह्यात पहिल्यांदा आदर्शवत निर्णय घेऊन १०० रुपये किंमतीने मिळणारे सॅनिटायझर ग्रामपंचायत ५० टक्के अनुदानावर प्रति लिटर ५० रुपये किंमतीत मिळणार असल्याची माहिती उपसरपंच संजय जगताप यांनी दिली.
सोमेश्वर कारखान्याने तयार केलेले सॅनिटायझर उद्या पासून सभासद बिगर सभासद स्थानिक स्वराज्य संस्था यांना वितरण होणार आहे. कारखाना या सॅनिटायझरची किंमत १०० रुपये प्रतिलिटर ठेवली आहे. प्राथमिक स्वरूपात उद्या ग्रामपंचायत सोमेश्वर कारखान्याकडून ५०० लिटर सॅनिटायझर खरेदी करणार असून उद्याचं पासून याचे वितरण वाणेवाडी ग्रामस्थांना अवघ्या ५० रुपये प्रति लिटरने केली जाणार आहे. यासाठी कुठल्याही ग्रामस्थांनी घर सोडायचे नसून प्रत्येक वाडी वस्ती व वार्ड मध्ये जाऊन ग्रामपंचायत याचे वितरण करणार आहे.
कृपया मोकळी बाटली आणावी
ग्रामपंचायत उद्या कारखान्याकडून पाच लिटर च्या कॅड मध्ये या सॅनिटायझर ची खरेदी करणार आहे. त्यामुळे ज्या ग्रामस्थांना पाच लिटर सॅनिटायझर खरेदी करायचे आहे त्यांना ते कॅनसह मिळणार आहे मात्र ज्या ग्रामस्थांना एक लिटर किंवा चार लिटर असे खरेदी करायचे असेल त्या ग्रामस्थांनी मोकळी बाटली आणावी ,सार्वजनिक अंतर पाळावे व गर्दी करू नये असे आवाहन उपसरपंच जगताप यांनी केले आहे.