विनम्र आवाहन
खेडेगावातील लोकांना विनंती
कोरोना विषाणूची भिती आपल्याला नाही का. आपल्याला कोरोनाचा संसर्ग होणारच नाही का? शेतातील अती महत्त्वाचे काम असेल तरच करा. नविन काही काम वाढवू नका. विनाकारण शेतीचे काम आहे म्हणून फिरु नका वेळ खराब आहे. शेती पिकांचे जादा पैसे मिळतील म्हणून गाव सोडून नका. व्यापारी शेतात येतील पीक तोडुन नेतील पण त्यांना लोकवस्तीत फिरवत बसु नका. दोन पैसे कमी मिळतील पण आपले, आपल्या कुटुंबातील सदस्यांचे तसेच गावचे आरोग्य धोक्यात आणू नका.
लॉकडाऊन सुरू होऊन २२ दिवस झाले तरी आजही खेडेगावात कोरोना जनजागृती झाल्याचे दिसून येत नाही. कारण ही तसेच आहे. आजही गावबंद असताना ही मुंबई, पुणे व इतर शहरातुन आपलेच बांधव रातोरात कुटुंबासह गावाकडे येत आहेत. ते प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस किंवा ग्रामपंचायत प्रशासनाला कोणतीही कल्पना देत नाहीत. ते खेडेगावात आलेल्या नंतर शेजा-यांना दिसल्या नंतरच कोणीतरी भितीपोटी गावातील आशा सेविकांना कळवते मग त्या सेविका नाव नोंदणी करतात. त्यांनी देलेल्या सुचन फक्त ऐकल्या जातात, त्यांची पाठ फिरली कि मुंबईकर आणि गावकरी एका पंगतीत मटणावर ताव मारतात. त्यात भर .... समजुन जा.
क्वारंटाईन राहणे म्हणजे काय हे माहित असुनही आपल्याच कुटुंबाला कोरोनाच्या खाईत ढकलण्याचा हे महाभाग अप्रत्यक्ष प्रयत्न करत आहेत. केव्हिड १९ विषाणूचा संसर्ग कसा होतो हे चांगल्या पद्धतीने माहिती असुनही ही शहरी अतिसुक्षित मात्र निष्काळजीपणाचा कळस करत आहेत. कधीही सुगीच्या काळात, दिवाळीला, ग्रामदेवतेच्या यात्राला, कुटुंबातील सुख दुःखाला हजेरी न लावणारे आता गावभर हाप चड्डी घालून आजही फिरत आहेत.
या महाभागांना वास्तवीक क्वारंटाईन म्हणजे एका वेगळ्या खोलीत १४ ते २१ दिवस वास्तव्य करणे बंधनकारक आहे. त्यांना कोणतीही लक्षणे आज दिसत नसली तरी ते कोरोना विषाणूचे soft career आहेत. या soft career चाच अधिक धोका होणार आहे. म्हणुनच लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. गावात आलेल्या या आमच्याच बांधवांना हात जोडून विनंती कृपया क्वारंटाईन रहा आरोग्य कर्मचा-यांनी दिलेल्या सुचेना तंतोतंत पाळ. आपले , आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनचे, शेजारच्यांचे व पर्यायाने संपूर्ण गावाचे आरोग्य धोक्यात आणू नका. शहर सोडून का आला आहात हे आपणास चांगले माहीत आहे. आता आलाच आहात तर क्वारंटाईन म्हणुनच घरात वेगळ्या खोलीत बसा.
काही चुकीचे असल्यास क्षमस्व.
आपलाच