सोमेश्वर कारखान्याकडून आज पासून सॅनिटायझर आणि मास्क चे वाटप सुरू

Pune Reporter
सोमेश्वर कारखान्याकडून आज पासून सॅनिटायझर आणि मास्क चे वाटप सुरू

सोमेश्वरनगर   दि   १३  एप्रिल

सोमेश्वर कारखान्याने तयार केले सॅनिटायझर  तसेच मास्क चे वाटप आज पासून सोमेश्वर विद्यालयात त्याचे वाटप सुरू केले आहे. 
           सकाळी दहा वाजता सोमेश्वर विद्यालयात या वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संचालक शांताराम कापरे, कार्यालयीन अधीक्षक सुभाष धुमाळ, कामगार अधिकारी दीपक निंबाळकर, सतीश निंबाळकर, अविनाश जगताप, सुनील धुमाळ आणि सभासद हजार होते. सोमेश्वर कारखान्याने सोमेश्वर नावाने सॅनिटायझर तयार केले असून त्याची विक्री आजपासून सुरू केली आहे, बाहेरील बाजारातील याची एक लिटरची विक्रीची किंमत २३६ रुपये असून कारखान्याने कार्यक्षेत्रातील सभासद, बिगर सभासद, शासकीय, निमशासकीय कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था यांना एक लिटर अवघ्या १०० लिटर ने उपलब्ध करून दिले आहे 

तसेच कारखान्याने मास्क सुद्धा वाजवी किंमतीमध्ये उपलब्द करून दिले आहेत. यासाठी सोमेश्वर विद्यालयात चार काउंटर बनविण्यात आली असून सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी कारखान्याच्या वतीने तीन फूट अंतरावर ब्लॉक आखण्यात आले आहेत, कोणीही गर्दी न करता खरेदी करावे असे आवाहन कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे.
To Top