सोमेश्वरनगर दि ८ एप्रिल
बारामती तालुक्यातील श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान च्या वतीने समाजातील २५ गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
वाघळवाडी, निंबुत, मुरूम, करंजेपुल, करंजे, चौधरवाडी येथील २५ गरजू कुटुंबाना ही मदत देण्यात आली. यावेळी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त adv गणेश आळंदीकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश जगताप, पत्रकार दत्ता माळशिकारे, संतोष शेंडकर, युवराज खोमणे, विनोद गोलांडे, तुषार धुमाळ, adv नवनाथ भोसले, ऋषिकेश गायकवाड, निलेश गायकवाड, हेमंत गायकवाड, सिद्धार्थ गीते आदी मान्यवर उपस्थित होते.