भाजी मार्केट, किराणा माल बंद, करंजेपुल ग्रामपंचायतीचा निर्णय
सोमेश्वरनगर दि ८ एप्रिल
बारामतीत चार कोरोनाचे रुग्ण सापडले, या पार्श्वभूमीवर करंजेपुल ग्रामपंचायतीने भाजी मार्केट व किरणा माल ची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सरपंच वैभव गायकवाड यांनी दिली.
आठवड्यातुन फक्त दोनच दिवस भाजी मंडई व किराणा मालाची दुकाने सुरू ठेवण्यात येणार आहेत.
जगामध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे बारामती मधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या चार पोहोचले आहे.
कोरोनासंसर्गाची साखळी तोडणं आणि नागरिकांचा जीव वाचवणं देशातील प्रत्येक व्यक्तीचं आज एकमेव कर्तव्यं आहे. त्यासाठी घराबाहेर न पडणं, बाहेरील व्यक्तीच्या संपर्कात न येणं, कोरोनाला प्रसाराची संधी न देणं आणि कोरोनाची साखळी तोडणं, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.