-घरूनच करावी हनुमान जयंती साजरी
सोमेश्वरनगर दि ७ एप्रिल
वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये बहुतांशी ठिकाणी हनुमान मंदिर आहेत उद्या हनुमान जयंती आहे. त्यामुळे कुणीही घराबाहेर पडू नये. उद्या घरीच थांबा आणि हनुमान जयंती साजरी करा, पूजा, अर्चा, प्रार्थना घरातच करावी, असं आवाहन वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी केलं आहे.
जगामध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे बारामती मधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या चार पोहोचले आहे.
कोरोनासंसर्गाची साखळी तोडणं आणि नागरिकांचा जीव वाचवणं हे पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून देशातील प्रत्येक व्यक्तीचं आज एकमेव कर्तव्यं आहे. त्यासाठी घराबाहेर न पडणं, बाहेरील व्यक्तीच्या संपर्कात न येणं, कोरोनाला प्रसाराची संधी न देणं आणि कोरोनाची साखळी तोडणं, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पुढील सूचना येईपर्यंत
सण, उत्सव, पूजा, अर्चा, यात्रा, जत्रा, प्रार्थना, धार्मिक कार्ये ही घरातंच करावीत, कुणीही घराबाहेर पडू नये,अन्यथा विनाकारण घराबाहेर पाडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असे सोमनाथ लांडे यांनी सांगितले .