ऊसतोडणी कामगारांची गावाकडे जाण्याची लगबग
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखाना आज बंद होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आता ऊसतोडणी कामगारांना आपल्या गावाकडे जाण्याचे वेध लागले असून कामांची लगबग सुरू झाली आहे.
पुणे जिल्ह्यात एकमेव सोमेश्वर कारखाना अजून सुरू आहे. आज रात्री किंवा उद्या ऊस गळीत थांबणार आहे. आता ऊसतोडणी कामगारांना आपल्या गावाकडे जाण्याचे वेध लागले आहेत, त्यामुळे त्यांच्या विविध कामांची लगबग सुरू झाली आहे. कारखान्याची ऊसतोडणी थांबली असली तरी ऊसतोडणी कामगार त्यांच्या मर्जीने गावाला जाऊ शकत नाही, ऊसतोडणी कामगारांना त्यांच्या गावाला सुखरूप पोहचविण्याची जबाबदारी आता साखर कारखान्यांवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता ४ हजार ऊसतोडणी कामगारांच्या कुटुंबाची वैद्यकीय तपासणी सुरू झाली असून त्यांच्या गावनिहाय याद्या साखर आयुक्तांना पाठवण्यात आल्या आहेत. १० हजार ३०० ऊसतोडणी कामगारांच्या तपासण्या पूर्ण झाल्या नंतर त्यांच्या त्यांच्या गावी सुखरूप सोडले जाणार आहे
सोमेश्वर रिपोर्टर चे प्रतिनिधी तुषार धुमाळ यांनी ऊसतोडणी कामगारांची लगबग याची काही क्षणचित्र टिपले आहेत