लोणावळ्यातुन तो चक्क चालत पोहचला वाणेवाडीत

Pune Reporter
लोणावळ्यातुन तो चक्क चालत पोहचला वाणेवाडीत

सोमेश्वरनगर  प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील वाणेवाडी या गावात लोणावळ्यातून १७० किलोमीटर अंतर तीन दिवसात पार करून तो आज चक्क वाणेवाडीत पोहचला, चांगली बाब म्हणजे हा युवक घरी न जाता त्याने चक्क वाणेवाडीचे ग्रामपंचायत कार्यालय गाठले, आणि या युवकाने प्रशासनाला सहकार्य करत स्वतः होऊन प्राथमिक शाळेत क्वारेंटाईन झाला. 
#जाहिरात
             वाणेवाडी येथील एक युवक कामानिमित्त लोणावळा या ठिकाणी होता. त्याही ठिकाणी सगळे बंद झाल्याने त्याने आपल्या मूळ गावी वाणेवाडी या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला, मात्र वाहने च बंद असल्याने त्याने चक्क चालत जाण्याचा निर्णय घेतला. लोणावळ्यातुन १७० किलोमीटर अंतर पार करण्यासाठी त्याला तीन दिवस लागले. आज सकाळी तो वाणेवाडीत पोहचला, त्याने आपल्या घरी फोन करून आल्याची कल्पना दिली. आणि वाणेवाडी ग्रामस्थांच्या निर्णयाला साथ देत थेट वाणेवाडी ग्रामपंचायत कार्यालय गाठले. या ठिकाणी त्याची तपासणी करून ग्रामपंचायतीने त्याला प्राथमिक शाळेत क्वारेटाईन करण्यात आले आहे. 


बाहेरून जर कोणी गावात आला तर त्याला क्वारेनटाईन करून १५ दिवस प्राथमिक शाळेत ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला होता. या निर्णयाला या युवकाने प्रतिसाद दिल्याने त्याचे हे काम कौस्तुकस्पद आहे. त्याच्या राहण्याची व जेवणाची सोय ग्रामपंचायत मार्फत केली जाणार आहे.
संजय जगताप- उपसरपंच वाणेवाडी
To Top