सोमेश्वरनगर येथील प्रकार
सोमेश्वरनगर दि ३ एप्रिल
एकीकडे कोरोणा व्हायरस जागांमध्ये धुमाकूळ घातला आहे त्यामुळे प्रशासनाकडून एकमेकांमध्ये सार्वजनिक अंतर ठेवण्यास सांगण्यात आले आहे व काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
त्याचे सगळीकडे पालन केले जात आहे पण हे पालन करत असतांना बँकेतत येणाऱ्या ग्राहकांना मात्र सार्वजनिक अंतर त्यांच्या जीवावर बेतणार आहे .ग्राहकांना दैनंदिन जीवनासाठी पैसे काढण्याची गरज असते त्यामुळे ग्राहक सकाळपासूनच बँकेत रांगा लावत आहे. काही कामचुकार बँक कर्मचार्यांच्या सततच्या फोन वापरण्यामुळे मंद गतीने काम करत आहेत त्यामुळे ग्राहकांना तासंतास कडक उन्हात लाईनमध्ये उभारण्याची वेळ आली आहे या रांगांमध्ये महिला ,ज्येष्ठ नागरिक ,अपंग, वृद्ध आहेत यांचा जीव गेलातर जबाबदार कोण ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे
गाव कारभारी का बँक कर्मचारी?
सोमेश्वरनगर परिसरातील एका राष्ट्रीयकृत बँकेमधील एक कर्मचारी हा गाव कारभारी असून तो बँकेत आल्यानंतर बॅक सेवा बजावण्यापेक्षा गावाचा कारभार जास्त वेळ फोन वरुन हाकतो तो तासनतास फोनवर ती बोलण्यात मग असल्यामुळे कामाकडे लक्ष देत नाही त्यामुळे ग्राहकांना तासंतास ताटकळत लाईनमध्ये उभे रहावे लागते.
लॉक डाउन आणि मार्च एन्ड आहे त्यामुळे आम्हाला काही विचारू नका?
तुम्हाला माहित नाही काय मार्चऍण्ड आहे आम्हाला कामाचा व्याप आहे पैसे काढायच्या असतील काढा नाहीतर इतर कर्जाबाबत काही विचारू नका १४ एप्रिलनंतर या असा नागरिकांना सज्जड दम भरला जात आहे.