मुरूम ग्रामपंचायतीने केले २९८ लोकांना क्वारंटाइन
सोमेश्वरनगर दि ३ एप्रिल
मुरूम ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावठाण, म्हतोबामाळ, फरांदेवस्ती, बुणगेववस्ती, सळोबालिफ्ट या ठिकाणी पुणे आणि मुंबई वरून आलेले ऐकून २९८ लोकांना आज नोटिसा देऊन क्वारंटाईन करण्याचा करण्याचा निर्णय ग्रामपंचायत मुरूम आणि आरोग्य विभागाने घेतला आहे.
आज या २९८ लोकांच्या घरी जाऊन त्यांना ग्रामपंचायतीची पत्रे देऊन त्यांना होम क्वॉरेंटाईन करण्यात आले. काल मुरूम गावातील २१८ लोकांना होम क्वॉरेंटाईन करण्यात आले असून त्यांची माहिती बारामती आरोग्य विभागाला कळविण्यात आल्याची माहिती उपसरपंच निलेश शिंदे यांनी दिली. आज दिवसभर ही संख्या एकूण २९८ वर गेली आहे. यासाठी ग्रामपंचायत सदस्य आणि आरोग्य विभाग कर्मचारी धावपळ सुरू आहे.
संपून राज्य लॉकडाउन झाल्यावर खेडेगावातून कामानिमित्त गेलेले लोकांनी आता ग्रामिण भागाचा आश्रय घेतला आहे. मात्र हे सर्व लोक १५ ते २० दिवसापूर्वीच गावाला अलेली आहेत. त्याच वेळी त्यांना क्वॉरेंटाईन करणे गरजेचे होतं.